आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने पथसंचलन

आळेफाटा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा (ता. जुन्नर) पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये बुधवारी (दि. 16) पथ संचलन करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यसाठी, तसेच मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे. यासाठी जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना आणि आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी (दि. 16) आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आणे, बेल्हे, साकुरी, राजुरी, पिंपळवंडी आळे या संवेदनशील भागात केंद्रीय राखीव दलाचे पोलीस राज्य राखीव दलाचे पोलीस व आळेफाटा पोलीस कर्मचारी व होमगार्ड
यांनी या पथसंचलन केले.

या पथसंचलनात आळेफाटा पोलीस ठाण्याचे पंचविस पोलीस कर्मचारी केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी आणि होमगार्ड सहभागी झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या साडेचारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर ऐंशी जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली
फोटो-

Leave A Reply

Your email address will not be published.