तळेगावात पोलिसांचा “सशस्त्र रूट मार्च’

तळेगाव दाभाडे – मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी (दि. 17) तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, बाजारपेठ मार्गे गणपती चौक, शाळा चौक आदी परिसरात “सशस्त्र रूट मार्च’ काढण्यात आला.

या वेळी देहुरोड विभागाचे सहायक पोलीस उपायुक्‍त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, अधिकारी दिगंबर अतिग्रे, संदीप गाडीलकर, काळूराम गवारी, निलेश बोकेफोडे यांच्यासह सीआयएफएस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, तसेच पोलीस व होमगार्ड असे 210 अधिकारी व सशस्त्र जवानांचा सहभाग होता.
तळेगाव दाभाडे परिसराला छावणीचे रूप आले होते. या रूट मार्चने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.