करोना योद्‌ध्यांसाठी रोटरीचा पुढाकार

राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रास पीपीई कीटसह दिले इतर साहित्य

बेल्हे (पुणे)- राजुरी (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

 

आळेफाटा येथील रोटरी क्‍लब आळेफाटा मेन यांच्याकडून राजुरी (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केद्रास पीपीई किट, एन 95 मास्क, सॅनिटायझर इ. साहित्य वाटप करण्यात आले. प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडेकर, डॉ. टाके, आळेफाटा रोटरीचे अध्यक्ष शिवाजी गोरे, संपत राहणे, जाधव, धीरज औटी, ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, नीतिन औटी व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

आरोग्य केंद्रासाठी साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी क्‍लब आळेफाटा मेनचे प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी व आपत्ती व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत राजुरीने आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.