नगर (प्रतिनिधी) – महापालिका संचालित, आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब चालवत असलेल्या विनामूल्य रोटरी कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना रोटरी कम्युनिटी किचनमधुन नाष्टा, व दोन वेळचे जेवण विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहे. या रोटरी कम्युनिटी किचनला हायाजिन फर्स्ट या संस्थेकडून मानांकन प्राप्त झाल्याची माहिती गीता गिल्डा यांनी दिली.
यावेळी हायाजिन फर्स्टच्या वतीने वैशाली गांधी, निर्मल गांधी तसेच प्रसन्ना खाजगीवले, अमित बोरकर, क्षितिज झावरे, निलेश वैकर, उमेश रेखे, अमृत कटारिया आदी रोटरी सभासद उपस्थित होते.
हायजीन फर्स्ट या संस्थेकडून रोटरी किचनची 2 वेळा पाहणी करण्यात आली होती. स्वच्छता, हायाजीन, कचरा पेटी, ओला सूका कचरा ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था, कर्मचारी यांना अप्रन, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सि मीटर, थर्मल गन इत्यादी गोष्टी रोटरी कडून उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच किचनमध्ये साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून, शासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून या किचन मध्ये काम केले जात असल्याबद्दल हायाजिन फर्स्ट या संस्थेकडून समाधान व्यक्त करण्यात आल्याची माहिती क्षितिज झावरे यांनी व्यक्त केली. या किचन मधून दररोज 120 रुग्णांना विनामूल्य पौष्टिक आणि सकस आहार पुरवला जात आहे.
रोटरीच्यावतीने चालवल्या जात असलेल्या या सेंटर साठी जैन ओसवाल युवक संघ, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान, इंटिरिअर डिझायनिंग असो., संत निरंकारी आश्रम, विजेता क्रिकेट क्लब, इनर्व्हील क्लब व्हिनस, सहज फाऊंडेशन अशा अनेक संस्था सहकार्य करत असल्याची माहिती रफिक मुंशी यांनी दिली. या सेंटर साठी दिगंबर रोकडे, ईश्वर बोरा, देविका रेळे, पुरुषोत्तम जाधव, सुयोग झंवर आदी उपस्थित होते.