रोनाल्डो व मेस्सी एकाच संघातून खेळणार

बर्लिन – जागतिक फुटबॉलमधील दोन दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी येत्या काळात एकाच क्‍लब संघातून खेळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

युरोप, अमेरिका, ब्राझील तसेच अन्य देशांत होत असलेल्या मानाच्या स्पर्धांमध्ये आजवर हे दोन खेळाडू परस्परांविरुद्ध खेळताना पाहिले गेले आहेत. मात्र, आता जर रोनाल्डोने समोर आलेला बार्सिलोनाचा प्रस्ताव स्वीकारला तर हे दोन दिग्गज खेळाडू एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत.

सध्या रोनाल्डो युवेंन्ट्‌स संघाकडून तर, मेस्सी बार्सिलोनाकडून खेळतो. या दोन्ही खेळाडूंनी युरोपा लीग, बुंदेसलिगा, चॅम्पियन्स अशा मानांकित स्पर्धांमध्ये यंदा एकमेकांविरोधात खेळ केला. मात्र, पुढील वर्षी युवेंन्ट्‌सचे संघव्यवस्थापन रोनाल्डोशी करार वाढविण्यास उत्सुक नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी बार्सिलोनाने रोनाल्डोला कराराचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव जर त्याने स्वीकारला तर तो मेस्सीसह प्रतिस्पर्धी संघांची डोकेदुखी वाढवताना दिसणार आहे.

रोनाल्डो युवेंन्ट्‌सच्या आधी रेयाल माद्रिदकडून खेळत होता. मात्र, त्याने 9 वर्षांचा करार संपल्यावर हा क्‍लब सोडला. आता बार्सिलोनाचा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील मोसमात हे दोन्ही दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.