Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर लवकरच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या दोघेही व्यस्त आहे. मात्र यादरम्यान दोघांचाही रोमॅंटिक अंदाजामधील एक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये या कपलचा “जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो” या गाण्यावरील रोमॅटिंक अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. याच गाण्यावर सचिन आणि सुप्रिया या जोडीचा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे. Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar |
View this post on Instagram
सध्या दोघांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडूनही प्रेमाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर तब्बल 19 वर्षाने या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते फार उत्सुक आहेत. Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar |
या भागात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर त्यांच्या प्रवाशांसह हा प्रवास रेल्वेने करणार असून अशोक सराफ हे टीसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार हे कलाकार असणार आहेत.