कतार – अरब देशांमध्ये मूळातच अनेक कडक नियम लागू केले जातात आता कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नवीन जाचक नियम जारी केले असून त्यामध्ये रोमान्सवरही आता नियंत्रण लादण्यात आले आहे पती पत्नी शिवाय इतर कोणत्याही जोडप्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करू नयेत असा नियम जारी करण्यात आला आहे.
हा नियम फक्त कतारमधील नागरिकांनाच लागू नसून पर्यटनाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी येणाऱ्या परदेशी नागरिकांना सुद्धा या नियमाचे पालन करावे लागणार आहे पती-पत्नी नसलेल्या जोडप्यानी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आले तर त्यांना सात वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
कतारमध्ये इस्लामी शरीयत कायदा लागू असून त्याप्रमाणे लग्न न झालेल्या व्यक्तींनी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा मानले जाते तसेच समलैंगिक संबंध प्रस्थापित करणार्यांना सुद्धा शिक्षा दिली जाते डेली स्टार या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे हा गुन्हा एखाद्या परदेशी नागरिकांनी केला तरी त्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागणार आहे.
फुटबॉल स्पर्धा सुरू असताना हॉटेलमध्ये दारू पिणे किंवा पार्टी करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे हॉटेलमध्ये वेगवेगळी आडनाव असणारी लोक एकत्र एका रूम मध्ये राहू शकणार नाहीत एखादा जोडप्याला एकाच खोलीत राहायचे असेल तर ते पती-पत्नी आहेत हे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे वर्ल्ड कपचे मुख्याधिकारी नासीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रोमान्स किंवा प्रेम संबंध हा आमच्या संस्कृतीचा भाग नाही त्यामुळे आम्ही या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत आहोत.