अजय देवगणने घेतली रोल्स रॉईस

“सिंघम’ अजय देवगणला आलिशान कारचे पहिल्यापासून खूप वेड आहे. “कॉफी विथ करण’मध्ये तो आला तेंव्हाच त्याने ऑडीची सीरीज विकत घेतली होती. याशिवाय अजय देवगणकडे लॅन्ड रोवर रेंज रोवर, बीएमडब्ल्यू 5 क्‍लास, ऑडी क्‍यू 7 क्‍लास आणि मॉडिफाइड टोयोटा यासारख्या एकापेक्षा एक सरस कार आहेत. आता या गाड्यांच्या ताफ्यामध्ये रोल्स रॉईस रोल्स कुलियनची भर पडली आहे. या कारची किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही आलिशान कार विकत घेणारा अजय देवगण हा तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या अगोदर मुकेश अंबानी आणि टी सिरीजचा मालक भूषण कुमार यांनीच ही महागडी कार विकत घेतली आहे.

रोल्स रॉईस कार फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणखी काही जणांकडे आहे. अक्षय कुमार, चिरंजीवी, अमिताभ बच्चन आणि अदि गोदरेज यांच्याकडे रोल्स रॉईसचे फॅन्टम मॉडेल आहे. तुफान वेग आणि आलिशान लुक ही खासियत असल्याने ही कार अगदी निवडक ग्राहकांनाच उपलब्ध करून दिली जाते. या बाकी सर्वांना ही कार कोणीना कोणी तरी गिफ्ट दिलेली आहे.

दरम्यान अजय देवगण सध्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील “तानाजी द अनसंग हिरो’च्या प्रोडक्‍शनमध्ये बिझी आहे. 150 कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमात अजय स्वतः तानाजीचा रोलमध्ये आहे, तर त्याच्या समवेत काजोल आणि सैफ अली खान देखील दिसतील. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये “तानाजी’ रिलीज होणार आहे. दीपिका पदुकोण लीड रोड साकारत असलेल्या “छपाक’शी त्याचा सामना होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×