करीनाच्या सीतेच्या भूमिकेला का होतोय विरोध? जाणून घ्या कारणे…

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच आता तिच्याविरुद्ध ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेन्ड सुरू झाला आहे. काय आहे हा वाद, वाचा….

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सच्या टीकेला सामोरं जावे लागते आहे. ट्विटरवर तर #BoycottKareenaKhan असा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. याला कारण आहे ते म्हणजे रामायणावरील एका नवीन पौराणिक सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी करिना कपूरने 12 कोटी रुपये मानधन मागितल्याची चर्चा आहे.

स्वत: हिंदू असून परधर्मियाशी विवाह केलेल्या करीनाने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले असल्यानेही हा विरोध आहे. तैमूरलंगाने भारतावर आक्रमण करुन इथली संपत्ती लुटून नेली होती, हे करीनाला माहिती नाही काय, असेही नेटीझन्स विचारत आहेत.

यावरुनच सध्या करीनाला ट्रोल केले जात आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना आता पुन्हा एकदा कामाला सुरूवात करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रामायणावरील एका सिनेमामध्ये सीतेची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शकांनी तिला संपर्क केल्यानंतर तिने 12 कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे.

“बाहुबली’चे लेखक केव्ही प्रसाद राव आणि अलौकिक देसाई लिखित “द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या कथेत असा काय भाग आहे, जो कोणाला माहिती नाही, असे प्रश्‍नही अनेकांनी उपस्थित केले आहेत. सीतेचे जीवन दर्शन सर्वज्ञात असताना त्यात “अनटोल्ड’ काय आहे, असेही अनेकांनी विचारले आहे.

यानंतर अनेक नेटिझन्सनी करिनावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. तसेच काहींनी तर करीनावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे. एकीकडे ही चर्चा असताना सोशल मीडियावर करीनाविरोधात मिम्स आणि ट्विट्सचा पाऊस सुरू झाला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार करिना कपूर एका सिनेमातील भूमिकेसाठी साधारणपमे 6 ते 8 कोटी रुपये मानधन घेते, पण सीतेच्या भूमिकेसाठी तिने 12 कोटी रुपये मागितल्याने अनेकांचा संताप झाला आहे.

काही हिंदुत्ववाद्यांनी तर करिनाला ही भूमिका देऊन हिंदूंच्या भावना दुखावू नयेत अशी मागणी केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर करिना कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर या सिनेमाचे लेखक विजय प्रसाद यांनी या भूमिकेसाठी करिनाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे या चर्चांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.