ही अभिनेत्री साकारणार जयललिताची भूमिका !

यंदा अनेक राजकीय नेत्यांचे बायोपिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत. बड्या नेत्यांच्या या बायोपिक्सच्या यादीमध्ये आता जयललितां यांच्या बायोपिकची देखील भर पडली असून जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेला बायोपिक लवकरच चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

जयललितांची भूमिकेसाठी अभिनेत्रीचं नाव फायनल झाले आहे. अभिनेत्री कंगना राणौत जयललितांच्या भूमिकेसाठी निवडली गेलीय. कंगना राणौतचं मणिकर्णिकामधल्या राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेसाठी कौतुक झाल होत. आता कंगना दुसरी आव्हानात्मक भूमिका साकारायला सज्ज झालीय. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केलीय. त्यांनी ट्विट केलंय. हा सिनेमा तामिळ आणि हिंदीत रिलीज होईल. दिग्दर्शन एएल विजय यांचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.