तेलुगू निर्माता सुरेश बाबू हे एका कोरियन ड्रामा असलेलया “मिस ग्रैनी’चा हिंदी रिमेक साकारत आहेत. या रिमेकमध्ये मुख्य भुमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेतही साकारण्यात येणार असून यात सामंथा अक्कीनेनी ही मुख्य भूमिका निभाविणार आहे.
“मिस ग्रैनी’ हा कोरियन ड्रामा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक 74 वर्षीय महिला स्टूडियोमध्ये फोटो काढण्यासाठी गेली असता रहस्यमयरित्या ती 20 वर्षांची होते. यानंतर ती संगीत क्षेत्रात आपले करियर घडविते. पण याबाबत तिच्या नातवाला काहीच माहिती नसते.
दरम्यार, या चित्रपटाचा तेलुगू व्हर्जन हा नंदिनी रेड्डी या निर्मिती करणार असून “ओह बेबी’ असे त्याचे नाव असणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच श्रद्धा कपूर ही नितीश तिवारी यांच्या आगामी “छिछोरे’ चित्रपटातही एका वृद्ध महिलेची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तिने “हसीना पारकर’मध्येही एका वयोवृद्ध महिलेची भूमिका यशस्वीपणे निभावली होती. सध्या श्रद्धा कपूर ही प्रभाससोबत “साहो’ आणि वरुण धवनसोबत “स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये काम करत आहे.