रोहितची पंतला शिवीगाळ; मंडळाच्या भूमिकेवर लक्ष

विशाखापट्टणम: भारताचा शतकवीर सलामीवीर रोहित शर्माने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रोहितकडून हे गैरवर्तन दुसऱ्यांदा घडले आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना रोहितने पंतवर नाराज होऊन भर मैदानात शिवी दिली. रोहितचा आवाज स्टंपमाइकमध्ये स्पष्ट ऐकू येतो. विंडीजच्या फलंदाजीतील 33 व्या षटकात जेसन होल्डरने एक धाव घेतली.
पंतने चेंडू फिल्ड केला व गोलंदाजाकडे फेकला, त्याएवजी फलंदाजाच्या दिशेने फेकला असता तर होल्डरला धावबाद करण्याची संधी मिळाली असती.

त्यामुळे चिडून रोहितने पंतला उद्देशून काही वक्तव्य केले, अर्थात रोहितने हिंदीमध्ये शिवी घातल्याचे स्टंपमाईकमध्ये अगदी स्पष्ट ऐकू येत आहे. रोहितचे वर्तन खेळाडूंच्या आचारसंहितेचा भंग करणारे आहे, मात्र मंडळ काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.