मुंबई – रोहित शेट्टी सध्या आपल्या आगामी चित्रपट सर्कसच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. रोहितचा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणीच असते. खळखळून हसायला लावणारे आणि पूर्णपणे मनोरंजन करणारे सिनेमे रोहित शेट्टी बनवत असल्यामुळे प्रेक्षक देखील त्याला भरभरून प्रतिसाद देतात. सिंघम,गोलमाल,संडे असे अनेक हिट सिनेमे आजवर रोहित शेट्टीने दिले. विशेष म्हणजे यातील बर्याचश्या अभिनेत्यांनी रोहित शेट्टीसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. यातील काही चेहरे मराठी इंडस्ट्रीतील देखील आहेत. नुकतेच रोहितने आपण मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटात का घेतो याबाबतचा खुलासा केला.
सर्कसच्या प्रमोशनसाठी रोहित शेट्टी आणि टीम एका मराठी कॉमेडी शोमध्ये आले होते. यावेळी रोहित शेट्टीने आपण मराठी कलाकारांना सिनेमात का संधी देतो याबाबत भाष्य केलं. तुमच्या सिनेमात अनेक मराठी कलाकार दिसतात असा प्रश्न रोहित शेट्टी यांना विचारला असता ते म्हणाले, मला प्रामाणिकपणे वाटत की मराठी कलाकार हे खूप प्रतिभावान आहेत. असं असूनही ते खूप साधे आहेत. त्यानं अहंकार नाही. नखरे करणारे अनेक कलाकार आहेत परंतु मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो असं स्पष्ट मत रोहित शेट्टी यांनी आईवेळी व्यक्त केलं.
View this post on Instagram
मला ज्या सिनेमातून उत्पन्न मिळत त्यात महाराष्ट्राचा ६० % वाटा आहे. त्यामुळे माझ्या सिनेमात जाणीवपूर्वक मराठी कलाकार दिसतात असाही रोहित शेट्टी यावेळी म्हणाला. रोहित शेट्टीच्या सर्कसमध्ये सिद्धार्थ जाधव,विजय पाटकर आणि अश्विनी कळसेकर असे मराठी कलाकार आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी कलाकारांनी यापूर्वीही रोहित शेट्टींसोबत काम केलेलं आहे.