मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक कष्ट केले. आपल्यातील अनेकांना त्याच्या अॅक्शन फिल्म आवडतात. चित्रपटाच नेहमी वेगवेगळे प्रयोग करताना रोहित नेहमी दिसतो. मात्र रोहितबाबत एक महत्वाची गोष्ट आपल्यातील अनेकांना माहित नाही.
रोहितचे बाबा एम. बी. शेट्टी हे नृत्य दिग्दर्शक होते. त्याचबरोबर ते स्टंटमॅनही होतो. त्याची आई मधू यांनी जुनियर आर्टीस्ट म्हणून अनेक चित्रपटात काम केले. या सगळ्या काळात त्यांची परिस्थिती हलाखिची होती.
रोहितने 13 व्या वर्षीच दिग्दर्शक व्हायचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी त्याने काही वर्ष सिनेअभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करण्याचं काम केलं. कामाचे फक्त 35 रुपये मिळायचे. अभिनेत्री तब्बूच्या साडीला इस्त्रीदेखील मी केली आहेॆ, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
वयाच्या 17व्या वर्षी फुल और काटे या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर अनेक वर्ष कष्ट केले आणि स्वत:चा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. 2005 साली जमीन चित्रपट केला आणि 2006 साली गोलमाल चित्रपट केला. गोलमाल चित्रपटाने रोहितच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.