रोहित शेखर यांच्या मृत्यूचा तपास आता गुन्हे शाखेकडे

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांचा मृत्यू झाला होता. शेखर तिवारी याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रान्च) सोपवण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये रोहित बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला होता. दिल्लीतील मॅक्‍स साकेत रुग्णालयात शेखरने अखेरचा श्वास घेतला होता. त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरी, पोस्टमार्टम अहवालात हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे म्हंटले आहे.

मागील वर्षी 18 ऑक्‍टोबर 2018 रोजी एनडी तिवारी यांचे निधन झाले होते. 2008 मध्ये रोहित शेखरने न्यायालयात खटला दाखल करून एनडी तिवारीच आपले जैविक वडील असल्याचा दावा केला होता. डीएनए रिपोर्टमध्ये ही बाब उघडकीस आल्यानंतर मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचे मान्य केले होते. यानंतर तिवारी यांनी 2014 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी लग्न केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.