#CWC19 : रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडणार ?

साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवित उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी भारताला मिळणार आहे.

मागील तीन सामन्यात रोहितने 2 शतक आणि 1 अर्धशतक झळकावत आपले इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळं आज अफगाणिस्तानविरोधातही रोहितने दमदार खेळी करावी अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

विश्वचषकात रोहितने चांगली कामगिरी करत रेकॉर्ड तोड फलंदाजी केली आहे. त्यातच आज त्याला आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी रोहितला केवळ दोन षटकारांची गरज आहे. त्यानंतर रोहित सर्वात जास्त षटकार लगावणारा भारतीय फलंदाज ठरेल. दुसरीकडे धोनीनं 292 सामन्यात 225 षटकार लगावले आहेत. तर, रोहितनं 203 सामन्यात 224 षटकार लगावले आहेत.

सर्वात जास्त षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पाचव्या स्थानावर आहे. सर्वात जास्त षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत शाहिद आफ्रिदी 351 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ख्रिस गेल 318 आणि जयसुर्या 270 षटकारांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर धोनी 225 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)