#ICCWorldCup2019 : विराटच्या मदतीसाठी मी नेहमी तयार – रोहित शर्मा

लंडन – न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यातील दारुन पराभवानंतरही भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या मते भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब नसुन भारतीय संघ विश्‍वचसक स्पर्धेत तितक्‍याच जोमाने पुनरागमन करेल.

यावेळी बोलताना रोहित म्हणाला की, विराट कोहलीचा संघ आश्‍वासक आहे. कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षात त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी त्याला माझी गरज असेल, त्यावेळी मी हजर आहे. संघाचे हित ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

दरम्यान, विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना न्युझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने भारताला हा सामना एकतर्फी गमवावा लागल्याने भारतीय संघावर टिका होत असुन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील तळाच्या फळीतील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)