#CWC19 : ‘हिटमॅन’ची आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी

लीड्‌स – रोहित शर्मा आणि विक्रम यांचे अतूट नाते आहे. लीड्स येथे त्याने श्रीलंकेविरूध्द शतक ठोकले आणि विश्वचषक स्पर्धेत पाच शतके करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळविला. त्याने कुमार संगकारा याच्या नावावर असलेला चार शतकांचा विक्रम मोडला.

भारताच्या रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना रोखणारा सध्यातरी नाही याचाच प्रत्यय घडवित प्रत्येकी शतक साजरे केले. त्यांच्या या तडाखेबाज खेळामुळेच भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. त्यांनी विजयासाठी असलेले धावांचे लक्ष्य 43.3 षटकांत पार केले.

रोहितने एकाच विश्‍वचषक स्पर्धेत पाच शतके करण्याचा विक्रम केला. 2015 मध्ये लंकेच्या कुमार संगकारा याने 4 शतके केली होती. या विक्रमाची रोहितने यापूर्वीच बरोबरी केली होती. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग तीन शतके करणारा रोहित हा 11 वा खेळाडू आहे. याआधी संगकारा (4 शतके), झहीर अब्बास, सईद अन्वर, हर्षल गिब्ज, अब्राहम डीव्हिलियर्स, क्विन्टॉन डीकॉक, रॉस टेलर, बाबर आझम, जॉनी बेयरस्टो व विराट कोहली (प्रत्येकी 3 शतके) यांनी हा मान मिळविला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.