#ICCWorldCup2019 : भारताला दुसरा झटका; रोहित 140 धावांवर बाद

मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्याला सुरूवात झाली असून भारताने 200 धावांचा आकडा पार केला आहे. दरम्यान भारताला दुसरा झटका बसला आहे. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा 113 चेंडूत 140 धावा काढून माघारी परतला आहे. रोहित शर्माला हसन अलीने झेलबाद केले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 42 षटकांत 2 बाद 261 धावा झालेल्या आहेत. विराट कोहली 48*(50) तर 10*(12) धावांवर खेळत आहेत.

 

रोहितने 85 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केलं. रोहित शर्माचं विश्वचषक2019 स्पर्धेतील दुसर तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 24 वे शतक ठरलं. रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्यानं पाकिस्तान विरोधात सलग शतकी खेळी केली आहे. याआधी आशिया चषक 2018मध्ये रोहितनं 111 धावांची खेळी केली होती.

 

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.