नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याची स्पेनच्या ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी मुंबईत ला लीगाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. स्पर्धेच्या ९० वर्षांच्या इतिहासात फुटबाॅलपटू नसलेला रोहित शर्मा असा मान मिळवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Here he is…🤩
The new #LaLiga Brand Ambassador in India, Rohit Sharma! 🇮🇳🏏⚽✨
Welcome, @ImRo45! 🤝🙌 pic.twitter.com/ecMsRb9rzS
— LaLiga English (@LaLigaEN) December 12, 2019
रोहितने मिळालेल्या सन्मानाबदल भारावून गेल्याचे सांगताना ला लीगाचे आभारही मानले. रोहितच्या या नियुक्तीमुळे आता भारतीय फुटबाॅलपटूंना देखील प्रेरणा मिळेल व भविष्यात भारतीय फुटबाॅलमध्येही आणखीन प्रगती होईल.
Hola India/España, as you guys know, football has always held a special place in my heart so this association is so special to me. And to be named the ambassador for the La Liga is so humbling. So excited for this partnership @LaLigaEN pic.twitter.com/prZFFSeHdV
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2019
स्पॅनिश लीगचा चाहता असलेल्या रोहितने सांगितले की, ‘ मला झिनेदान झिदानचा खेळ खूप आवडतो. त्याच्यामुळेच मी फुटबाॅल नियमितपणे पाहू लागलो’