रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. बुधवारी बीसीसीआयने सोशल मीडिया याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी भारतीय संघ १४ खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाह दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी संघात कोणाला स्थान डीलर जाणार याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याअगोदर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याचा परिवार मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.
बुधवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. यावेळी रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह आणि त्यांची मुलगी समायराही पाहायला मिळाले. रोहित आपली मुलगी समायराला खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसले. मंदिरात पूजा करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याअगोदर बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये भारतीय संघाचे १४ सदस्य आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमवेत संघ व्यवस्थानातील सदस्य दिसत आहेत. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. ( Rohit Sharma and daughter Samaira Visit Siddhivinayak Ganapati in Mumbai before leaving for Australia )
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग. स्टँडबाय: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.