Indian Test Team Captain : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा सूफडा साफ केला. यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माला भारतीय कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे, पण आता प्रश्न असा आहे की, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले तर कोणत्या खेळाडूकडे कमान मिळणार? भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचे दावेदार कोण आहेत? सध्या जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्याकडे पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह आहे. याशिवाय त्याने सुमारे 2 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी जसप्रीत बुमराह हा चांगला लीडर आहे यात शंका नाही. भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्याव्यतिरिक्त तो सतत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. अशा स्थितीत जसप्रीत बुमराहचा दावा मजबूत मानला जात आहे.
त्याचबरोबर शुभमन गिलचा भारतीय एकदिवसीय आणि टी-20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून विचार केला जात आहे, पण कसोटी फॉरमॅटमध्ये शुभमन गिलची कामगिरी चांगली राहिली नाही, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन शुभमन गिलवर दाव लावणारका, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय ऋषभ पंतकडे मोठा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी उत्कृष्ट होती. तसेच ऋषभ पंत टीम इंडियाकडून सातत्यानं खेळत आहे. ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे, पण भारतीय संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिलपेक्षा ऋषभ पंतला प्राधान्य देईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पुढील काळात रोहित शर्माच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूची भारतीय कसोटी कर्णधार म्हणून निवड करते हे पाहणे मनोरंजक ठरेल?