जामखेड : आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाच वर्षे तुमची सेवा केली आता महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी रोहित पवारांना देऊ कारण महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. असे मत शरद पवार यांनी खर्डा येथील कार्यक्रमात केले.
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न देशाचे माजी कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंहराजे होळकर, निलेश लंके, साहेबराव दरेकर, राहुल मोटे, अमोल राळेभात, सुधीर राळेभात, कैलास वराट, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, संजय वराट, विजयसिंह गोलेकर, सुर्यकांत मोरे, वैजनाथ पोले, हनुमंत पाटील, सागर कोल्हे, बापुसाहेब कार्ले, प्रशांत राळेभात यांच्या सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शरदचंद्र पवार एमआयडीसीला जुन्या लोकप्रतिनिधीकडून विरोध अडचणी आणण्याचे काम सुरु कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला हवा होता. कारण यामुळं अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.
पण एमआयडीसी होतेय म्हटल्यावर त्याला विरोध करणे, अडचणी आण्याचे काम सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले. रोहित पवारांच्या प्रयत्नामध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केल्याचे शरद पवार म्हणाले. दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याचे शरद पवार म्हणाले.
खरा भुमीपुत्र आपली काळजी घेणारा असतो. आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा असतो, आपल्या मतदारसंघाचा विकास करणारा असतो काही जण मात्र कोरोना काळात गोरगरीब जनतेला आधार देण्याऐवजी बागेतील झाडांना पाणी घालत होते तो कसला आलाय भुमीपुत्र अशी टीका खासदार निलेश लंके यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली.