रोहित पवारांनी ‘असा’ केला मुलाचा हट्ट पूर्ण ;सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मुंबई : आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो.. मग तो सर्वसामान्य नागरिक असो कि कोणी सेलेब्रिटी असो..मुलांचे हट्ट आणि त्यांचा आनंद यासाठी सर्वजण प्रयत्न करतात…मग यात राजकारणातील नेतेमंडळी कसे काय मागे असणार…? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही आपल्या मुलाचा असाच एक हट्ट पुरवावा लागला आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे…

व्यस्त अशा राजकीय वेळापत्रकातून रोहित पवार यावेळी त्यांच्या मुलाच्या हट्टापायी केस कापण्यासाठी गेले. राज्याच्या सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्या पवार यांचा बराच वेळ हा दौरे, भेटीगाठी अशाच कामांमध्ये जातो. त्यामुळं कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी त्यांना फार कमीच मिळते.

यावेळी त्यांना ही संधी मिळाली आणि “बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही”, असं म्हणत त्यांचा मुलगा शिवांश यानं त्यांच्याकडे आपल्यासोबत केस कापण्यासाठी येण्याचा हट्टच धरला. लाडाच्या मुलानं हट्ट धरला म्हटल्यावर तो पूर्ण करण्यावाचून आपल्याकडे कोणताच पर्याय नव्हता, असं म्हणत रोहित पवारांनीही शिवांशच्या चेहऱ्यावर हसू आणलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.