“त्या” आमदारांच्या घरवापसीवर रोहित पवारांचे मोठे विधान म्हणाले,…

मुंबई  –  लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी सत्तेसाठी  भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी मेगा भरती दिसून आली. यात अनेक नेत्यांनी वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश घेतला मात्र  राज्यात मविआ सरकार आल्यामुळे या आयाराम गया रामची चांगलीच फजिती झाली होती.  यांनबाबत   राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपूर येथे  एका खासगी कार्यक्रमात गौप्यस्फोट केला आहे.   

रोहित पवार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘भाजपच्या आजी-माजी आमदारांची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असल्याचा  आहे.   भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, शरद पवार ,  जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची होती.  प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश  देणार असल्याची राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.