मुंबई – दादर-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले असून येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. खासदार डेलकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर केलेले. येथील पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.
कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत भाजपच्या महेश गावित यांना धूळ चारली. डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचंही मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणाला मिळालेलं सणसणीत उत्तर तर आहेच पण देशातील परिवर्तनाची नांदीही आहे.” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचंही मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणाला मिळालेलं सणसणीत उत्तर तर आहेच पण देशातील परिवर्तनाची नांदीही आहे. pic.twitter.com/tqSsACH8Yj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 2, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी, “हे निकाल असे सांगत आहे की २०२४ साली केंद्रामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यावेळी आज जे नाचे नाचत आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगत आहेत ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार,” अशी रोखठोक प्रतिक्रिया दिली.