अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट

जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा !

वारंवार होणाऱ्या रस्ता अपघातात अनेक निष्पापांचे जीव जात आहेत.रस्ता सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत रोहित पवार यांनी चर्चा केली.असे अपघात घडू नयेत यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जामखेड  – संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वैद्य त्रयोदशीला असुन या सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या पालखीला आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाटातुन जात असताना अपघात झाला.जेसीबी मशीनचे ब्रेक फेल होऊन या अपघातात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज तुळशीदास नामदास यांच्यासह ह.भ.प.अतुल महाराज आळशी या वारकऱ्याचा देखील दुर्दैवी अपघाती निधन झाले. या अपघातात सुमारे सतरा वारकरी जखमी झाले असुन त्यांच्यावर पुणे हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नोबेल हॉस्पिटलला भेट देत त्यांची विचारपूस केली.त्यांचे म्हणणे ऐकुन घेत रोहित पवार यांनी त्यांना दिलासा दिला. आय.सी.यु.मध्ये जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या या वारकऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले.पवार यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली असता अपघातात जखमी असलेले वारकरी आता काळजी बाहेर असल्याचे डॉक्टरांकडुन सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)