मुंबई – राज्यातील इंधनदरवाढीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारलाच लक्ष्य केले आहे. ‘राज्य सरकारने ‘कॅसकेडिंग टॅक्स’ कमी करण्याची आवश्यकता आहे. इंधनाच्या करातील १२ रुपये राज्य सरकारला मिळतात. राज्य सरकारने आधी स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे,’ असे फडणवीस काल पुण्यातील पुण्यात म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाण साधत फडणवीस साफ खोटे बोलत असल्याचे सांगितले आहे.
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही. pic.twitter.com/Mj02RkRobt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
रोहीत पवार म्हणाले की, ”खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही.”
”केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात.”
”विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.” असा जोरदार हल्ला रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.