पुणेः नुकतेच राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळ्यात आले असल्याने शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सूत्रे आपल्याकडे घेतली असून एकनाथ शिंदे यांचे नाव वगण्यात आले आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची वर्णी लागली आहे. यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदस्य नसणे ही बाब आश्चर्यचकित असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तासाभराच्या पावसात तुडुंब भरणारी पुणे व मुंबई सारखी कोटीपर्यंत लोकसंख्या असणारी शहरे तसेच शहरी भागात आपत्तींची वाढलेली संख्या यामुळे आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. असं असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांचा समावेश नसणे ही बाब आश्चर्यकित करणारी असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तासाभराच्या पावसात तुडुंब भरणारी पुणे व मुंबई सारखी कोटीपर्यंत लोकसंख्या असणारी शहरे तसेच शहरी भागात आपत्तींची वाढलेली संख्या यामुळे आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. असं असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 11, 2025
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात शिंदे साहेबांचा समावेश मुद्दाम टाळला की इतर कारणांमुळे टाळला हे अंदाज असूनही सांगता येणार नाही. परंतु आपत्ती व्यवस्थापनात नगर विकास खात्याचाच समावेश नसेल तर आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी राहण्याचा धोका उद्भवू शकतो, असे मत मांडते तरी राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात नगरविकास मंत्र्यांचा समावेश होईल ही अपेक्षा. अशी पोस्ट त्यांनी एक्सवरून शेअर केली आहे.
आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची महत्वाची भूमिका तरीही….
या समितीत महसूल, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या समितीत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनता नगरविकास खात्याची महत्वाची भूमिका असते. असे असतानाही शिंदेंचा सदस्य म्हणून समावेश नसणे ही बाब आश्यर्यकारक मानली जात आहे. तसेच फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष असल्याचे बोलले जात आहे.