त्या ‘कर्जमाफी’बाबत रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी

पुणे – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे ५० बड्या कर्जबुडव्यांचे (विलफुल डिफॉल्टर) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची कबुली देण्यात आली असून याबाबत रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत व्यक्त होताना रोहित पवार यांनी, “प्रामाणिक कर्जफेड करणारे मध्यम, लघु व्यावसायिक व उद्योजक,गृह व वाहन कर्जधारक यांच्या मदतीसाठी सरकारशी नेहमीच झगडावं लागतं. पण अनेक बँकांना गंडा घालणाऱ्यांचं तब्बल 68 हजार कोटी ₹ चं कर्ज मात्र @RBIसहजपणे राइट ऑफ करते. ही बातमी वाचून मन सुन्न झालं.” अशी  प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी  यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागवली होती. रिझर्व्ह बँकेतर्फे याबाबत उत्तर देताना ५० बड्या कर्जबुडव्यांचे (‘विलफुल डिफॉल्टर’चे) ६८ हजार ६०७ कोटींची कर्जे राइट ऑफ खात्यात टाकल्याची माहिती देण्यात आली.

याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना गोखले यांनी, राहुल गांधींनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच आपण हा अर्ज केल्याची माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Comment
  1. Kiran mne says

    Rohit sir ashi karje Garib lokanchi mafa hota nahit lagech tyancha gharadaracha nilav kadatat banka kitek lokanchi ghare ya bankani nilavat kadhun tyana beghar keley ha konta nyay aahe

Leave A Reply

Your email address will not be published.