संदिप भैय्या लोकांमध्ये जाऊन काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका जोरात सुरु केला आहे. गेल्या महिनाभरापासून रोहित पवार दांडगा जनसंपर्क जोडत आहेत. आपल्या मतदारसंघातचं नाही तर महाराष्ट्रभर ते फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.
दरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी बीडला आयोजित केलेल्या युवक मेळाव्याला काल उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. रोहित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केल्यामुळे बीड जिल्ह्यात संदिप भैय्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार निवडून आले. त्यामुळेच धनुभाऊच्या माध्यमातून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे पवार म्हणाले.
त्यामुळे यापुढे लोकांची कामं तर होतीलच पण विविध विकासकामेही वेगाने होतील, असा मला विश्वास आहे. संदिप भैय्या हा लोकांमध्ये जाऊन काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता असून विकासाचं राजकारण करण्यासाठी त्याच्यामागे असंच उभं रहा असं आवाहन यावेळी रोहित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं.
फक्त JCB आमदारच फिरत नाही तर अख्ख पवार घराण फिरत आहे . महाराष्ट्राची काळजी, शेतक-यांची काळजी, खुल्या भुखंडाची ओळख वगैरे वगैरे कामे आहेत.