#CWC19 : जलद शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित

मँचेस्टर – पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना रोहित शर्माने 85 चेंडूमध्ये शतकाची नोंद केली. या कामगिरीसह रोहित शर्मा विश्‍वचषक स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. या यादीमध्ये विरेंद्र सेहवाग 81 चेंडूत झळकावलेल्या शतकासह पहिल्या स्थानावर आहे.

तर, विराट कोहलीने 83 चेंडूंमध्ये शतक झळकावत दुसरे स्थान पटकावले असून सचिन तेंडुलकरने 84 आणि शिखर धवनने 84 चेंडूंमध्ये शतक झळकावत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे. तर, रोहित 85 चेंडूत शतक झळकावत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

#ICCWorldCup2019 : हिटमॅनचे 85 चेंडूत दमदार शतक

Leave A Reply

Your email address will not be published.