मुंबई : गेली चार दशकं भाजपमध्ये असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला मदतच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या सोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे असे म्हणत त्यांचे स्वागत केले.
राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी स्वागत केले आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल.
माननीय खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यक्तीमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले.