पॅरिस – भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. बोपण्णाने आपला नेदरलॅंडचा सहकारी खेळाडू मॅटवे मिडेलकूप याच्यासह ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा व मिडेलकूप जोडीने ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल व फिनलंडच्या हॅरी हेलीओव्हारा जोडीचा 4-6, 6-4, 7-6 असा पराभव केला.
बोपण्णा आणि मिडेलकूप यांचा आता उपांत्य फेरीचा सामना 12 व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो व जीन-जुलियन रॉजर यांच्याशी होईल. बोपण्णाने 7 वर्षांनंतर ग्रॅंड स्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. बोपण्णा 2015 साली विम्बल्डन स्पर्धेत अखेरचा उपांत्य सामना खेळला होता. मात्र, त्यावेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.