राॅटरडॅम : भारताचा टेनिसपटू रोहित बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा जोडीदार डेनिस शापावालोव यांनी एबीएन अॅम्रो वर्ल्ड टेनिस स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
बोपण्णा-शापावालोव या जोडीने चौथ्या मानांकित रोमानियाच्या जीन-जूलियन रोजर आणि कॅनाडाच्या होरिया तेकाउ या जोडीचा ६-२, ३-६, १०-७ असा पराभव करत विजय नोंदविला.
Their hunt for a second title at the #abnamrowtt has come to an end.
Rojer/Tecau lose to Shapovalov/Bopanna: 2-6 6-3 7-10.
Congrats to the 🇨🇦🇮🇳 duo! They advance to the semifinals. pic.twitter.com/lbLwpzqbYg
— ABN AMRO Open (@abnamroopen) February 13, 2020
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आता ‘बोपण्णा-शापावालोव’ या जोडीसमोर ‘हेनरी कोंटिनेन आणि जान लेनार्ड स्ट्रफ’ यांचे आव्हान असणार आहे.