फेडरर मियामी ओपनच्या फायनलमध्ये दाखल

File photo

मियामी -आघाडीचा टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यांत कॅनडाच्या डेनिस शापोवलोपचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदाची लढत गतवेळच्या विजेता जॉन इस्नर विरुद्ध रॉजर फेडरर अशी रंगणार आहे.

यावेळी झालेल्या उपान्त्यफेरीच्या सामन्यात फेडररने डेनिसचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात पाहिल्या मिनिटापासून फेडररचा दाबदबा राहिला. त्याने सामन्यात प्रथम आघाडी घेतली आणि नंतर तिसऱ्या गेममध्ये त्याने डेनिसची सर्व्हिस भेदत आपली आघाडी कायम राखत सामना जिंकला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)