भाजपच्या जेष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी आज रॉबर्ट वढेरा आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याच्या बातमीवर मिश्किल टिप्पणी केली आहे. त्या म्हणाल्या, “मला याबाबत एकाच गोष्ट सांगावीशी वाटते, जिथं जिथं रॉबर्ट वढेरांना निवडणुकांच्या प्रचाराला जायची इच्छा आहे तेथील जनतेनं आता सावधान होण्याची गरज आहे आणि आपापल्या जमिनींची काळजी घ्यायला पाहिजे.”
दरम्यान, स्मृती इराणींनी रॉबर्ट वढेरा यांच्यावर केलेली ही मिश्किल टिप्पणी रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात सुरु असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकारणावरून आहे.
#WATCH Union Minister Smriti Irani reacts on Robert Vadra to campaign for Congress party for the #LokSabhaElections2019 says, 'itna hi kehna chahoongi, jahan-jahan Shri Robert Vadra prachaar karne jana chahte hain wahan ki janta aagah hojaye aur apni zameenein bacha le.' pic.twitter.com/N1C5B99ogT
— ANI (@ANI) April 7, 2019