वाड्रा यांना गुंतवणूकीत मदत करणाऱ्या उद्योजकास अटक
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर गुन्हा दाखल असलेल्या मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे.
वाड्रा यांचे सहकारी असलेल्या एका अनिवासी भारतीय उद्योजकाला ईडीने अटक केली आहे. सी.सी. थंपी असे अटक करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे थंपी यांनी लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वाड्रा यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रॉबर्ट वाड्रा यांच्याविरूद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सी.सी.थंपी यांना अटक केली आहे. थंपी हे अनिवासी भारतीय उद्योजक असून, ते वाड्रांचे अत्यंत जवळचे सहकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी वाड्रा यांना लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास मदत केली, असा आरोप आहे. थंपी यांची स्कायलाईट एझेडई नावाची दुबईत कंपनी आहे. या कंपनीचे वाड्रांच्या नावे भारतात असलेल्या कंपनीत शेअर आहेत.