रॉबर्ट वढेरा करोना ‘पाॅझिटिव्ह’; प्रियंका गांधी ‘आयसोलेशन’मध्ये

नवी दिल्ली – देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आणि कॉंग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनीही करोना चाचणी केली असून त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी सांगितले की, रॉबर्ट वढेरा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केला आहे. मी आता आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

त्यांनी ट्‌वीट करत सांगितले की, काही दिवसांपूर्वी करोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे मी माझा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द केला आहे. माझा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, परंतु, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी पुढील काही दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार आहे. असुविधेसाठी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. मी कॉंग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.