रॉबर्ट वढेरा व त्यांच्या मातोश्रींची जयपुर ईडी कार्यालयात चौकशी

प्रियांकांनी कार्यालयापर्यंत केली सोबत

जयपुर : राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची आज येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी रॉबर्ट वढेरा यांच्या मातोश्री मौरीन यांनाही तेथे चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. आपल्या पती व सासूंना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी स्वता प्रियांका गांधीही येथे आल्या होत्या. रॉबर्ट वढेरा यांनी ईडी समोर उभे राहण्याची ही चौथी वेळ होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजस्थान उच्च न्यायालयाने केलेल्या सुचनेनुसार आज ईडीनी या दोघा मायलेकांची चौकशी केली. सन 2015 साली या जमीन प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. रॉबर्ट वढेरा यांच्या मालकीच्या असलेल्या स्कायलाईट हॉस्पीटॅलिटी प्रा. लि. कंपनीने बिकानेर मध्ये काही वर्षांपुर्वी ही जमीन घेतली आहे. त्यात गैरव्यवहार झाल्याचा सरकारी तपास यंत्रणांचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)