पुणे(प्रतिनिधी) – कोणार्क एक्सप्रेसवर दौंड जवळ दरोडा टाकून महिलांचे दागिने लुटले याचा प्रकार समोर आला आहे. सिंग्नल कट करून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. तिघा चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करुन खिडकीतून दोघा महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसूत्र व साखळी हिसकावून नेली. बहिणीची सोनसाखळी चोरणाऱ्या या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली उतरलेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा चोरट्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे.
ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ रात्री पावणे नऊ वाजता घडली. दौंड रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विनायक श्रीराम (25 , रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
विनायक श्रीराम हे निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे चिरंजीव आहेत. ते बहिणीसह सोलापूरला जात होते. त्यांच्यावर दौंड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर रवाना झाले असून त्यांचा शोध घेतला जातो आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज काळकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क एक्सप्रेस रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरुन सुटली. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती दौंड रेल्वे स्टेशनच्या आऊटला असलेल्या नानविज फाटा येथे आली. तिला सिग्नल न मिळाल्याने ती थांबली होती. अगोदरच चोरटयांनी सिग्नलच्या वायरी कट केल्याने तिला सिग्नल मिळाला नव्हता.
“गुन्हेगारांच्या मागावर पथके रवाना केली असून लवकर गुन्हेगार जेरबंद करण्यात यश येईल
– सदानंद वायसे पाटील ( पोलीस अधिक्षक, लोहमार्ग)
गाडी थांबल्याचे पाहिल्यावर अंधारातून तिघे चोरटे पुढे आले. त्यांनी एस या डब्यात खिडकीत बसलेल्या महिलेल्या गळ्यातील ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावले. तिने आरडाओरडा करताच चोरटे पुढे पळाले. त्यांनी एस – डब्यातील दरवाज्यात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. बहिणीची चैन हिसकाविल्याचे पाहिल्यावर विनायक श्रीराम हे खाली उतरले. त्यांनी चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तेव्हा चोरट्यांनी रेल्वमार्गावरील दगड उचलून त्यांना मारले. त्यात त्यांच्या पायाला दगड लागून ते जखमी झाले. चोरटे अंधारात पळून गेले.