पिंपरी –भरदिवसा घरात घुसून महिलेचे तोंड दाबून आणि जिवे मारण्याची धमकी देत 2 लाख 77 हजारांचा ऐवज पळवला. ही घटना पाटीलनगर, बावधन बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी चंद्रभागा उत्तम दगडे (वय 48, रा. दगडे पाटील व्हिला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात एकटीच महिला असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात घुसून महिलेचे तोंड दाबले व तिला मारुन टाकण्याची धमकी देत गळ्यातील, कानातील, हातातील आणि पायातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 77 हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.