सिद्धेश्वर मंदिराच्या पिंडीवरील १५ किलो चांदीचे कवच चोरट्यांनी पळवले

रामचंद्र सोनवणे

राजगुरुनगर – राजगुरूनगर येथील प्राचीन आणि प्रसिद्द सिध्देश्वर मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाचे, कुलुप तोडुन मंदिरारातील श्री सिद्धेश्वराच्या पिंडीवरील १५ किलो चांदीचे कवच मध्यरात्रीच्य सुमारास चोरून नेले. राजगुरूनगर शहरातील भिमा नदीकाठी पुणे नाशिक महामार्गालगत प्राचीन काळातील हेमाडपंथी असे श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे. जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी असते. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविक येथे येतात. भाविकांनी ६ वर्षांपुर्वी सुमारे १५ किलोचे चांदीचे कवच नक्षीकाम करुन गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर बसवले होते.

शुक्रवारी (दि. 8) सांयकाळी साडेपाच वाजता पुजा आरती उरकुन रात्री ९.३० वाजता मुख्य दरवाजा बंद करून पुजारी महेश शंकर गुरुव मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यास गेले होते. आज (दि.९) सकाळी पहाटे साडेपाच वाजता देवाची पुजा करण्यासाठी गेले असता पिंडीवर चांदीचे कवच नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर, महेंद्र मधवे यांना हा चोरीचा प्रकार कळवला. रात्री २ वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पुर्वेकडील असलेल्या लोखंडी दरवाज्याचा कोंडा कटवाणीने तोडून, अज्ञात दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधुन आतमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत.

या चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाची दोन कुलुपे कटावणीने तोडून गाभाऱ्यात गेले. आतमधील काही दिसू नये म्हणून मंदिरात टाकलेले लाल कलरचे मॅट चोरट्यांनी टाकले. गाभाऱ्यातील चांदीचे कवच १० मिनटांमध्ये चोरट्यांनी हाताने काढुन चोरटे पळून गेले. 15 किलो चांदीच्या कवचाची किंमत सुमारे सात लाख वीस हजार आहे. खेड तालुक्यात गेली पाच वर्षांत अनेक मंदिरात चोऱ्या झाल्या आहेत, मात्र त्याचा तपास अद्यापही लागलेला नाही.

चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश बडाख यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत महेश गुरव यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यापुर्वी या मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.