आळेफाटा – दि 6 रोजी रात्री 10 च्या सुमारास आळे येथील नगर कल्याण हायवे रोडच्या बाजूला असलेल्या अविनाश जालिंदर पटाडे यांच्या मालकीच्या साई इलेक्ट्रॉनिक नावाच्या दुकानातुन बंदुकीचा धाक दाखवून जवळपास 21 हजार रु ची रोख रक्कम घेऊन पलायन केले होते. त्यामुळे अनंत पतसंस्था 14 नंबर आणि आळेफाटा येथील लागोपाठ घडलेल्या दरोडा प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आळेफाटा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा विभाग यांच्या टिम्स तयार करून विविध भागात तपास सुरू केला.
त्यानुसार गुन्हा करत असताना परिधान केलेले कपडे आणि त्यांच्या शरीर वर्णनानुसार पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा मध्ये तपास सुरू केला. त्यानुसार गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखाला दिलेल्या बातमीनुसार ऋषिकेश बळवंत पंडीत ( वय 22 वर्ष, रा खरवंडी,खळवाडी ता नेवासा) अरबाज नबाब शेख ( वय 20 वर्ष रा वडाळा व्हरोमबा ता नेवासा) वैभव रवींद्र गोरे ( वय 22 वर्ष खरवंडी ता नेवासा) राहुल राम चव्हाण ( वय 20 वर्ष रा खरवंडी ता नेवासा) ,प्रकाश विजय वाघमारे ( वय 20 वर्ष रा माळी चिंचोरा ता नेवासा), शुभम बाळासाहेब शिंदे ( वय 21 वर्ष, रा खरवंडी ता नेवासा) यांना अहमदनगर मधून विविध भागांतून अटक करून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. सदर दरोडेखोरांना अटक केल्यामुळे आळेफाटा परिसरातील नागरिकांमधून, व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे ,पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ), सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, आळेफाटा पोलीस स्टेशन हवालदार दिपक साबळे, हवालदार राजू मोमीन, कॉन्स्टेबल सुनील वारे, कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर ,दगडू विरकर ,प्रसन्ना घाडगे , प्रमोद नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व आळेफाटा पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे ,पीएसआय राजेंद्र पवार, पीएसआय रागिनी कराळे, पोलीस हवालदार चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार लहानु बांगर, कॉन्स्टेबल अमित मालुंजे, कॉन्स्टेबल निखिल मुरूमकर, कॉन्स्टेबल मोहन आनंदगावकर ,कॉन्स्टेबल हनुमंत ढवळे, कॉन्स्टेबल महेश काटमोरे, कॉन्स्टेबल अरविंद वैद्य, कॉन्स्टेबल प्रशांत तांगडकर, कॉन्स्टेबल गोरक्ष हासे ,ओतुर पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल केरूळकर , पोलीस हवालदार महेश पठारे तसेच जुन्नर पी एस आय युवराज पाटील, कॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी केलेली असून सदरचा गंभीर स्वरूपाचा दरोड्याचा गुन्हा अवघ्या दोन दिवसात उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.