पुणे – प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक घाेटाळा प्रकरणी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात कुटुंबा समवेत बंदिस्त आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांचे घरावर जप्तीची कारवाई करत ते सीलबंद केले आहे.
मात्र, चाेरटयांनी संबंधित अलिशान बंगल्याचा दरवाजाचा कडी-काेयंडा उचकटून घरात प्रवेश करुन सुमारे सात लाख रुपयांचे ऐवजचावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपीं विराेधात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय-३७,रा.पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे.
बांधकाम व्यवसायिक डीएसके यांनी चतृश्रृंगी मंदिरा जवळ डाेंगराचे कडेला सन २००६ मध्ये तब्बल ४० हजार चाैरस फुटात ‘सप्तश्रृंगी’ नावाने बंगला बांधला. त्यानंतर कुटुंबा समवेत ते या अलिशान घरात राहत हाेते. परंतु हजाराे गुंतवणुकदारांची दाेन हजार काेटीपेक्षा अधिकची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी चार वर्षापूर्वी अटक केली. त्यानंतर ईडीने ही त्यांचेवर कारवाई करत त्यांचे राहते घर जप्त केले व त्यास सील लावले हाेते. त्यामुळे मागील दाेन वर्षापासून घर बंद हाेते. बंगल्यात चाेरीची घटना उघडकीस आल्यानंतर ईडीचे अधिकारी, पाेलीस यांनी बंगल्याची पाहणी केली असता, अज्ञात आराेपींनी सदर घरातील आठ एलईडी टिव्ही, संगणक, लॅपटाॅप, इलेक्ट्राॅनिक वस्तू, तीन सीडी प्लेअर, गिझर, पिठाची गिरण, कॅमेरा, देवघरातील चांदीचे देव असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरी करुन नेला.