कामशेत – ताजे गावच्या हद्दीतील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालागत असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ हवा भरण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकास चार अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून चालकाच्या ताब्यातील 18 हजार 500 रुपयांची रोकड व मोबाइल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) पहाटे मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सूर्यनारायण शिवगोविंद सिंग (वय 41, रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे नाव आहे. त्यांच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. 11 ए. एल. 5837) घेऊन मंगळवारी (दि.22) पहाटे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना ट्रकच्या मागच्या चाकाची हवा गेल्याने हवा चेक करण्यासाठी ताजे गावच्या हद्दीतील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ ट्रक थांबवून चालक ट्रकमधून खाली उतरला असताना चार अज्ञात चोरट्यांनी ट्रक चालकास मारहाण करून ट्रक चालकाच्या जवळील मोबाइल व ट्रकच्या केबिन मधील 18 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक सूर्यनारायण सिंग यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.