मुंबई – केंद्रीय मंत्री आणि आपल्या कामाने आपली ओळख करून देणारे नितीन गडकरी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत . मराठवाड्यातील विविध विकास कामांची पाहणी त्याचबरोबर विकास कामांचे लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. 2024 पर्यंत मराठवाड्यातील रस्ते अमेरिकन दर्जाचे होतील, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 7 वर्षांत सुमारे 450 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले.
4,422 कोटी रुपयांच्या 13 कामांना मंजुरी देण्यात आली, त्यापैकी 5 कामे पूर्ण झाली असून 8 कामे अंतिम टप्प्यात आहेत. याठिकाणी औरंगाबाद ते पुणे हा नवीन महामार्ग बांधण्याची घोषणाही गडकरींनी केली आहे. या योजनेवर 10 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत
गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्री झाल्यानंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील रस्ते बांधणीसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली आणि सीआरपीएफच्या 30 कामांवर आतापर्यंत 463 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले. 2024 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 25 हजार कोटी रुपयांची कामे सुरू करून ती पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आज औरंगाबाद येथे ५,५६९ कोटी रुपये किंमतीच्या व २००.६१ किमी लांबीच्या ७ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे.. pic.twitter.com/JqtgzBGa0r
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 24, 2022
औरंगाबादचे रहिवासी अवघ्या दीड तासात पुण्यात
नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन दूतागती महामार्गाच्या उभारणीची घोषणा करताना सांगितले की, हा महामार्ग तयार झाल्यानंतर औरंगाबादचे रहिवासी अवघ्या दीड तासात पुण्यात पोहोचतील. या महामार्गाच्या कामावर केंद्र सरकार 10 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. हा महामार्ग बीड-अहमदनगर-पैठणमार्गे पुण्याला जाणार आहे. या महामार्गावर वाहनधारकांना 140 वेगाने वाहने चालवता येणार आहेत.