आळंदी परिसरात पोलिसांचा रूटमार्च

आळंदी/चिंबळी- आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील आळंदी शहरासह मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, गोलेगाव, चऱ्होली खुर्द, चिंबळी, केळगाव आदी 10 गावांत 131 जवानांस पाच अधिकाऱ्यांनी रुटमार्च (पथसंचलन)केला.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय अंतर्गत आळंदी देवाची पोलीस ठाणे व त्यास जोडणारी 10 गावांमध्ये सोमवारी (दि. 21) होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.

यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे 14 जवान, रेल्वे संरक्षण विशेष दल (आरपीएसएफ) चे 50 जवान व राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) चे 18 जवानांसह आळंदी देवाची पोलीस ठाण्यातील 22 जवान असे एकूण 131 जवान व पाच अधिकाऱ्यांचा आळंदी शहरासह परिसरातील गावांमध्ये बुधवारी (दि. 16) दुपारी रूटमार्च (पथसंचलन) करण्यात आले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी सांगितले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात वरील तुकड्या बंदोबस्तासाठी मागवण्यात आल्या असून शुक्रवार (दि. 25) पर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांततेत पार पाडावी यासाठी या सर्व जवानांची अधिकाऱ्यांची परिसरात बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.