पुणे – मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले.
प्रचंड पावसामुळे सासवड-जेजुरी पूलावरून पाणी गेल्याने रस्ता खचला आहे. काही काळ वाहतूक बंद ठेवल्यानंतर धीम्या गतीने रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.