पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलीसांकडून उपाय योजना केल्या जात आहे. पोलिसांनी महात्मा फुले भाजी मंडई येथे सोशल डिस्टनसिंग पाळले जावे, कोरोना रोगास आळा बसावा, म्हणून त्या परिसरातील गोटीराम भैय्या चौक, बुरूडआळी, अखिल मंडई, रतन सायकल मार्टच्या दिशेने जाणारे येणारे रस्ते बेरीकटिंग करून बंद केले आहेत.
सध्या मंडईमध्ये जाण्यासाठी मंडई बसटॉप कडील मुख्य रस्त्यावरून नागरिकांना 50-50 च्या गटाने मंडईमध्ये सोडण्यात येणार आहे.तरी कोणीही नागरिकांनी सदर ठिकाणी आपली वाहने आणू नयेत तसेच घरातील एकाच सदस्याने भाजी खरेदीसाठी पायी चालत यावे . भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांनी हॅन्डग्लोज सॅनिटायझरचा वापर करावा असे, अवाहन पोलिसांनी केले आहे .